गझल.... जुन्या विश्वात जाऊ

 

त्या जुन्या विश्वात तू जाऊन बघ 

गोष्ट आजीची जुनी सांगून बघ 


एवढाही ना करावा भरवसा 

आतला माणूस तू वाचून बघ 


मागल्याने हक्क अपुले ना मिळत 

त्याचसाठी आजही झगडून बघ


अंतरीच्या वादळाला शांत कर 

संयमाने तू मना जिंकून बघ 


वाटती वरवर तुला ते चांगले 

या जगाला एकदा निरखून बघ


वेळ येता चालुनी निर्धार कर 

शोषकांना लायकी दाऊन बघ 


मोह मायेचा पसारा भोवती 

सत्य केवळ त्यातुनी वेचून बघ


             ,,,,,, मारोती आरेवार

                   मो. 9403239435

Comments

  1. गझल आवडल्यास कमेंट करा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अन्नदाता

आला दिवाळीचा सण