आला दिवाळीचा सण


 

आला दिवाळीचा सण 

नायी आनंदाले उणं 

माय सकारी उठून 

करे सडा सारवण 


मास अस्विन हासत 

फुला फुलात दिसते

कशी चांदण्यानी रात 

लख्ख उजेडानं न्हाते


पीक पिवळं तांबूस

बाप पाहून डोलते 

आज वाऱ्याच्या झोतानं 

धरित्रीचं गाणं गाते 


माय रांगोळी काढते

माझं अंगण खुलते 

लेक येईल मायेरी 

वाट कवाची पायते 


रेलचेल फराळाची 

वास घरात घुमते 

आल्या गेल्या पाऊण्यानं 

घरं बोलकं वाटते


फटाक्याच्या आवाजानं 

गाव आज दनानलं 

सांज होताचं दिव्यानं

सारं गाव उजाडलं 


गाई मसीला पुजून

मानतात सारे ऋण 

साऱ्या सणाचा हा राजा 

असा दिवाळीचा सण 


       ,,,,,, मारोती आरेवार 

       9403239435

Comments

Popular posts from this blog

गझल.... जुन्या विश्वात जाऊ

अन्नदाता