Posts

समजदार....

Image
  माझ्यातला आत्मविश्वास जरासा प्रसरण पावला आहे... काल पहिल्यांदा मला आयुष्यात जिंकल्यासारखं वाटलं... अडचणीचं रडगाणं कुणापुढे न मांडता  सारं काही समजदार होऊन... समजत गेलो स्वतःला आणि समजावत गेलो स्वतःच्या मनालाही....आणि म्हणून मी थोडा समजदार झाल्यासारखा वाटतो स्वतःला. अपयश पचवणं सोपं नसतं तेवढं...भूतकाळाला मागे ढकलून... भविष्याचा वेध घ्यायला खूप हिम्मत करावी लागते.पण नेहमी लक्षात घ्यावं लागतं... भूतकाळ हा खूप काही शिकवून जातो... भूतकाळावर मात म्हणजे.. भविष्याचं द्योतक होय....हाच आत्मविश्वास असला ना... इथंच अर्ध जिंकल्यासारखं होतं ...आणि पुढचा प्रवास सुखकर होतो. जिंकल्यावर आरशात पाहावं स्वतःला...आपल्यातला अभिमान तर पुन्हा उफाळून आला नाही ना... थोडं स्वतःला विचारून पहावं... स्वतःला समजणे आणि समजावणे ही एक सृजनशीलताच वाटेल.                      ’'''''''मारोती आरेवार

आला दिवाळीचा सण

Image
  आला दिवाळीचा सण  नायी आनंदाले उणं  माय सकारी उठून  करे सडा सारवण  मास अस्विन हासत  फुला फुलात दिसते कशी चांदण्यानी रात  लख्ख उजेडानं न्हाते पीक पिवळं तांबूस बाप पाहून डोलते  आज वाऱ्याच्या झोतानं  धरित्रीचं गाणं गाते  माय रांगोळी काढते माझं अंगण खुलते  लेक येईल मायेरी  वाट कवाची पायते  रेलचेल फराळाची  वास घरात घुमते  आल्या गेल्या पाऊण्यानं  घरं बोलकं वाटते फटाक्याच्या आवाजानं  गाव आज दनानलं  सांज होताचं दिव्यानं सारं गाव उजाडलं  गाई मसीला पुजून मानतात सारे ऋण  साऱ्या सणाचा हा राजा  असा दिवाळीचा सण         ,,,,,, मारोती आरेवार         9403239435

अन्नदाता

Image
  काटा पायात रुतून लाल रगाद सांडलं रोज गणिक रं तुझ्या दुःख भाळी कोरलेलं अनवाणी पायांनी रं रोज तुडवतो रस्ता तुरं जगाचा पोशिंदा तरी खातोस रं खस्ता तू होऊनी सारथी शेतामधी राबतोशी पोट भरण्या साऱ्यांचे राहतोशी तू उपाशी तुला भीती ना मुळीही किड्या अन रं मुंग्यांची  औत हाकताना तुला काटे नि धसकट्याची राब राबून उन्हात किती चटके सोसतो सदा दुष्काळ नशिबी निसर्गही का कोपतो तू रं चालून चालून पाय किती भेगाळलं तुझ्या अंतरीचे दुःख नाही कुणी रं जाणलं किती सोसणार आता पोळलास वेदनांनी तुझी कदर कुणाला अन्नदाता तू असुनी

गझल.... जुन्या विश्वात जाऊ

Image
  त्या जुन्या विश्वात तू जाऊन बघ  गोष्ट आजीची जुनी सांगून बघ  एवढाही ना करावा भरवसा  आतला माणूस तू वाचून बघ  मागल्याने हक्क अपुले ना मिळत  त्याचसाठी आजही झगडून बघ अंतरीच्या वादळाला शांत कर  संयमाने तू मना जिंकून बघ  वाटती वरवर तुला ते चांगले  या जगाला एकदा निरखून बघ वेळ येता चालुनी निर्धार कर  शोषकांना लायकी दाऊन बघ  मोह मायेचा पसारा भोवती  सत्य केवळ त्यातुनी वेचून बघ              ,,,,,, मारोती आरेवार                    मो. 9403239435